किक्रेटपटू हरभजन सिंग आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री गीता बसरा हे लवकरचं विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. २९ ऑक्टोबरला या दोघांचे लग्न दिल्लीत होणार असून तब्बल पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
छायाचित्रात निमंत्रण पत्रिका चकचकीत लाल रंगाच्या बॅाक्समध्ये पॅक केलेली दिसत आहे. निमंत्रिताचे नाव नक्षीदार व उठावदार सोनेरी रंगात छापलेले आहे. ओमच्या मोठ्या प्रतीकाने बॅाक्सची आतील भाग सजवला आहे. निमंत्रण पत्रिकेची रचना ए.डी. सिंग यांनी केली आहे. गीता आणि हरभजन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा या दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. मात्र या दोघांनी कधीही सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती.

Story img Loader