मराठी मालिका विश्वात एआय तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करत नवी कोरी प्रेमकथा रंगवण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनीने ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत केला आहे. ही मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीने अभिनेता सुबोध भावे दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. माही आणि प्राध्यापक अभिमन्यू अशा दोन वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील एकच व्यक्तिरेखा सुबोध साकारणार आहे, तर अभिनेत्री शिवानी सोनार ही नायिकेच्या म्हणजेच गौरीच्या भूमिकेत दिसणार आहे.या नव्या मालिकेच्या पत्रकार परिषदेत बोलताना सुबोध भावेने आपल्या अभिनय कारकिर्दीत मालिकांचा वाटा सगळ्यात मोठा असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुरुवातीच्या काळात मी अनेक चित्रपट केले, पण खरी ओळख मला त्यावेळी केलेल्या मालिकांमधूनच मिळाली. सोनी मराठी वाहिनीवर एक रिअॅलिटी शो वगळता मी काम केलं नव्हतं. त्यामुळे खरोखरच एखादी चांगली मालिका या वाहिनीवर मिळेल याची मी वाट बघत होतो. वाहिनीचे व्यवसाय प्रमुख अजय भालवणकर यांनी मला ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेची कथाकल्पना ऐकवली, त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान वापरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवं तंत्रज्ञान वापरून काहीतरी नवीन प्रयोग केला जातो आहे तर आपण हा अनुभव घ्यायला हवं, असं वाटल्याने ही मालिका स्वीकारली’, असं सुबोधने सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first ai experiment in the serial universe tu behetshi navyane serial amy
Show comments