बहुतांश वेळा लहान मुलांना केंद्रभागी ठेवून केलेल्या मोठय़ासाठींच्या चित्रपटांचा प्रमुख हेतू हा निरागसता शोधण्याचा असतो. म्हणजे अनंत अडचणींच्या, संकटांच्या आणि वास्तव जगाच्या क्रूरतेची कल्पना नसलेल्या मनोवस्थेतील उचापतखोरी, उनाडगिरी आणि वयस्वाभाविक गोष्टी त्यात असतात. मग एखाद्या निश्चित बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत प्रवास करत प्रेक्षकांना आपल्या लहानपणाच्या आठवणींशी जोडण्याचे दुवे पेरत भावनिक उन्नयन करण्याचे काम हे निरागस वगैरे प्रकारचे चित्रपट करतात. गेल्या दहा वर्षांतील इराणी चित्रपट आवडणाऱ्यांचा मोठा वर्ग अशा निरागसनाटय़ांमुळे तयार झाला. तिथल्या चिल्ड्रन ऑफ हेवन, टर्टल्स कॅन फ्लाय या बाल्यदर्शनी चित्रपटांनी दाखविलेल्या दाहक-बिहक वास्तवामध्ये प्रेक्षक बऱ्यापैकी रमले. त्यांच्यासाठी बालपणातील वांडपणाचा कळस असलेला ‘द टीट अॅण्ड द मून’ हा स्पॅनिश सिनेमा, पौगंडोत्कट करामतींनी भरलेला ‘मलेना’ हा इटालियन चित्रपट आणि खऱ्या बंदुकांचा सैरावैरा खेळ करणाऱ्या लहानग्यांना दाखविणारा ‘सिटी ऑफ गॉड’ न झेपणाऱ्या कलाकृती ठरू शकतात. भावनिक उन्नयनाऐवजी प्रखर सुन्नता देणाऱ्या या कलाकृतींच्या पंगतीत बसवावा असा अ-निरागस बाल्यावस्थेचे दर्शन करून देणारा ‘द फ्लोरिडा प्रोजेक्ट’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्करस्पर्धेमध्ये (तीनच दिवसांनी जाहीर होणाऱ्या यादीत) सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी घुसळण करण्याची शक्यता अधिक आहे.
नंदनवनातील मुर्दाड जग..
गेल्या दहा वर्षांतील इराणी चित्रपट आवडणाऱ्यांचा मोठा वर्ग अशा निरागसनाटय़ांमुळे तयार झाला.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2018 at 01:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The florida project