‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलं आहे. या मालिकेमध्ये संभाजी राजेंची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंनी आपली जबरदस्त छाप पाडली आहे. ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांना आजवर विविध कार्यक्रमांमधून तब्बल दीडशेहून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत. मोल कोल्हे यांना विविध ठिकाणी त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून तलवार भेट दिली जाते. त्यापैकी दोनच तलवारी त्यांनी स्वत:कडे ठेवल्या असून, उर्वरित तलवारी ते टीममधल्या लोकांना देत असतात.
यापूर्वी त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. तसंच कोल्हे यांनी ‘शंभूराजे’ या नाटकाचे ५२० प्रयोगही सुरुवातीच्या काळात केले होते. त्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी राजे’ या महानाट्याचे त्यांनी १२५ प्रयोग केले. सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहेत.