सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा आहे ती सैराट या चित्रपटाची. या चित्रपटातील गाण्यांनी तर सगळ्यांनाच याड लावून टाकलंय. सर्वत्र सैराटमय वातावरण आपल्याला पाहावयास मिळत आहे.
सिने कलाकारांसह अनेकांनी सैराट या चित्रपटाचे कौतुक केले. इतकेच नाही तर या चित्रपटातील गाण्यावर मराठी कलाकारांनी ठेका घेतलेला व्हिडिओही आपण काही दिवसांपूर्वी पाहिला. या चित्रपटातील गाण्याचे वेड आता द ग्रेट खलीलाही लागले आहे.  द ग्रेट खलीने सैराट चित्रपटाचं गाण पाहिलं आणि त्यालाही ते आवडंल याचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय. यात खलीने आपल्याला सैराट चित्रपटातील गाणं आवडलं असल्याचं म्हटलंय. खली म्हणाला की, मला भाषा समजली नाही. पण मला त्याचं संगीत खूप आवडलं.

Story img Loader