एका काळाशी नाते सांगणारा सुपरस्टार चित्रपट अभिनेता जेव्हा वयात येतो तेव्हा त्याला पाहात मोठी झालेली पिढीही शरीरवयाने म्हातारी झालेली असते. पण त्या सुपरस्टारने कधीच म्हातारे होऊ नये, अशी त्यांची भाबडी इच्छा असते. परिणामी देव्हाऱ्यात ठेवण्यात आलेले अभिनेते उतारवयात प्रेक्षकांनी खिल्ली उडवेपर्यंत ‘हिरो’च्या भूमिका वठवत राहातात. ‘सारे काही प्रेक्षकांसाठी’ या सबबीखाली हे अभिनेते हिरोपणाची कवचकुंडले काढून फेकून द्यायला तयार नसतात. बॉलीवूडने असे कितीतरी तथाकथित ‘शोमन’, ‘चॉकलेट बॉय’ ‘अँग्री यंग मॅन’ ‘परफेक्शनिस्ट’ नटसम्राट दिले, ज्यांचे उतारवयातील नायकपण हास्यास्पद अवस्थेत पाहायला मिळाले. गेली काही वर्षे हॉलीवूडही बॉलीवूडचा कित्ता गिरवत असल्यासारखे उतारवयातील नायक चित्रपटांत पाहायला मिळत आहे. सिल्व्हस्टर स्टेलॉन, अरनॉल्ड श्वात्झनेगर, निकलस केज, ब्रुस विलीस आदी अभिनेत्यांच्या म्हातारचळी सिनेमांना यावर्षी प्रेक्षकांनीच मोठय़ा प्रमाणात नाकारले. या सगळ्या एकेकाळच्या ए ग्रेड हिरोंच्या निराशादायक कामगिरीच्या कल्ल्यात त्यांच्या काळामध्ये दुय्यम भूमिका वठविणाऱ्या सॅम एलियट नामक पूर्वी उपनायकाच्या भूमिका वठविणाऱ्या कलाकाराचा ‘द हिरो’ हा सिनेमा गाजतोय. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी हिरोपद गाठून त्याने या भूमिकेचे सोने करून ठेवले आहे. हिरो चित्रपटातला ली हेडन (सॅम एलियट) चाळीस वर्षांपूर्वी ‘द हिरो’ या वेस्टर्न चित्रपटामुळे सुपरस्टारपदी पोहोचलेला असतो. या एका भूमिकेने त्याला संपत्ती-ऐश्वर्य आणि सारे काही दिले असते. त्या हिरोपणाचे ओझे घेऊन तो सांस्कृतिक आणि सामाजिकरीत्या तो अजूनही जगत असतो. फक्त पूर्वीच्या आयुष्याशी फरक इतकाच असतो की आता त्याच्याजवळ जीवघेणा आजार असतो, सोबतीला नातेवाईकांपासून कुणीच नसते आणि फुटकळ जाहिरातींसाठी आपला करारी आवाज देण्यापलीकडे त्याच्याकडे काम उरलेले नसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा