बॉलीवूड अभिनेता आमिर खान पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘दंगल’ या चित्रपटात आमिर कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर नेहमी आपल्या भूमिकांसोबत प्रयोग करतचं असतो. विशेष म्हणजे या चित्रपटात तो कुस्तीपटूच्या भूमिकेत तर दिसलेच पण यात तो तीन मुलींच्या मध्यमवयीन वडिलांची भूमिकाही साकारणार आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटात आमिर हा भारताच्या कुस्तीपटू गीता, बबिता आणि संगिता यांचे वडिल आणि कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारेल. मात्र, आमिरच्या मुलींची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरले नसून त्यासाठी शोध सुरु झाला आहे. डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार याकरिता तीन अभिनेत्रींची नावे पुढे आल्याचे कळते. तापसी पन्नू, अक्षरा हसन आणि दीक्षा सेठ या तिघींची नावे पुढे आली आहेत. त्यापैकी तापसी पन्नूने ‘बेबी’ या चित्रपटात केलेले काम दिग्दर्शक नितेश तिवारीला भावल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘दंगल’साठी तिला घेण्यात येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा