द आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये The ICC Champions Trophy 2017 पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा १८० धावांनी दारूण पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीच्या फळीने भारतीय चाहत्यांना निराश केले. रोहित, विराट, युवराज, महेंद्रसिंग धोनी, शिखर या खेळाडूंकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या. संघाची दारोमदार त्यांच्या खांद्यावर होती. पण, दुसरी इनिंग सुरु होताच तासाभरातच सामना कोणत्या संघाच्या पारड्यात पडणार याचं चित्र स्पष्ट झालं. भारतीय संघाची सुरुवातीची फळी लागोपाठ तंबूत परतली. भारतीय संघ संकटात सापडला असताना बुडालेली नाव तारण्यासाठी हार्दिक पांड्याने पुरेपूर प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : अशोक सराफ यांच्या हसून हसून मेंटल करणाऱ्या ‘शेंटीमेंटल’चा ट्रेलर

आघाडीची फलंदाजी कोलमडल्याचे कोणतेही दडपण न घेता पांड्याने धाव बाद होण्यापूर्वी ४६ चेंडूत ७६ धावांची खेळी केली, आणि जलद गतीने अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला. पण दुर्दैवाने नशीबाने साथ दिली नाही आणि तो धावबाद  झाला. भारतीय संघाची एकमेव आशा असलेल्या पांड्याला मैदानातून तंबूत परतावं लागलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरच दु:ख साफ दिसत होतं. अर्थात त्याची विकेट जाण्यासाठी सगळ्यांनी जाडेजाला जबाबदार धरलं हा वेगळा मुद्दा झाला. नेहमी भारतीय संघ जिंकल्यावर जल्लोषात आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांनी संघाच्या पराभवानंतरही त्यांना पाठिंबा दिला. ‘तुम्ही लढलात, पण आजचा दिवस आपला नव्हता’ या शब्दांत भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यात हार्दिक पांड्याने केलेल्या खेळीबद्दल त्याचे विशेष कौतुक केले जातेय. असं असताना आपले बॉलिवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे पडतील. रणवीर सिंग, साकिब सलीम, कार्तिक आर्यन, रितेश देशमुख, तापसी पन्नू, शिबानी दांडेकर, गौहर खान यांसह अनेक कलाकारांनी ट्विट करून हार्दिकचे कौतुक केले. आम्हाला तुझा अभिमान असल्याचे म्हणत पाकिस्तान विरुद्ध केलेल्या खेळीने आमचं मन जिंकलस अशा भावना सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/Saqibsaleem/status/876467554327437313