अभिनेत्री रोशेल रावला ‘द कपिल शर्मा शो’ या शो मधून प्रसिद्ध मिळाली. यात तिने सुनील ग्रोव्हरच लोकप्रिय पात्र डॉक्टर मशूर गुलाटीच्या नर्सची भूमिका साकारली होती. नंतर तिने हा शो सोडला. रोशेल सध्या तिच्या आगामी वेब सीरिजसाठी काम करत असून तिने पुन्हा टीव्हीवर वापसी केली आहे. रोशेल पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सिझनमध्ये लॉटरी हे पात्र साकारतान दिसत आहे. तिने कॉस्टर सुनील ग्रोव्हरशी असलेल्या बॉन्ड बद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये सुनील ग्रोव्हरने ‘गुत्थी, डॉक्टर मशूर गुलाटी आणि रिंकु भाभी’च्या भूमिकेतुन सर्वांना हसवला होतं. कॉमेडी टाइमिंगमुळे त्याने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माशी सुरूअसलेल्या वादामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’या शोचा निरोप घेतला होता. एका मुलाखतीत रोशेलला तिच्या लॉटरी या नवीन पात्रा बद्दल आणि तिचा सुनील ग्रोव्हरशी संपर्कात आहे का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या विषयी बोलत असताना तिने सांगिलं, “कपिल शर्मामध्ये तुम्हाला सतत वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात. कधी गायक तर कधी वकिल. त्यामुळ लॉटरीची भूमिका सकारताना मला खुप आनंद होतं आहे आणि यावेळेस लॉटरीच स्वप्न बदलं  असून तिला आता वकिल व्हायची इच्छा झाली आहे.”

सुनील ग्रोव्हर विषयी बोलताना रोशेल म्हणाली, “सुनीलच्या संपर्कात राहणायच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं की मी इतर सह-कलाकार किंवा इंडस्ट्रीमधी इतर मित्रांप्रमाणे त्याच्या संपर्कात आहे. आम्ही नेहमीच एकमेकांच्या कामाचे कौतुक करत असतो, कामाची दाखल घेत असतो. सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा शो मध्ये परत यावा ही माझी देखील इच्छा आहे परंतु आता तो जे काही काम करत आहे ते तो उत्तम करत आहे आणि मी सुनीलला त्यासाठी शुभेच्छा देते”. दरम्यान सुनील ग्रोव्हरची वेब सीरिज ‘सनफ्लाॅवर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kapil sharma show fame actress roshel rao talks about her bond with sunil grover aad