‘द कपिल शर्मा शो’ लवकरच नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कपिल शर्माने शोच्या नव्या टीमसोबत शूटिंगलाही सुरुवात केली आहे. त्याने काही सेलिब्रेटींसह काही एपिसोडही शूट केले आहेत. अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार असून दोघांनी नुकतेच या एपिसोडचे शूटिंग केले. अक्षयचे सलग तीन चित्रपट फ्लॉप ठरले आणि अलीकडेच त्याचा चित्रपट ‘कटपुतली’ OTT वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच अक्षय कपिलच्या शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याने कपिल शर्माला त्याचे चित्रपट फ्लॉप झाल्याचा दोष दिला. कपिल शर्मामुळे त्याचे चित्रपट फ्लॉप होत आहेत असं यावेळी अक्षय कुमार म्हणाला आहे.

द कपिल शर्मा शोच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा अक्षय कुमार आणि रकुलप्रीत सिंगचे स्टेजवर स्वागत करत आहे. तो अक्षयला म्हणतो, ‘पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे होता? कपिलच्या या विधानावर अक्षय चिडतो आणि म्हणतो, ‘हा माणूस माझ्या चित्रपटांवर, पैशांवर खूप लक्ष देतो. याने एवढी नजर लावली की, आता कोणताही चित्रपट चालत नाही. अक्षयचं हे बोलणं ऐकताच कपिल शर्मा आणि प्रेक्षक हसायला लागतात. अर्थात अक्षय कुमारने कपिल शर्माला हे गमतीने म्हटलं आहे.
आणखी वाचा- “मुस्लीम असूनही…” गणपती बाप्पाची पुजा केल्याने सारा अली खान होतेय ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ येत्या १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि भारती सिंग या शोमध्ये दिसणार नाहीत. कृष्णा आणि सुदेश लाहिरी काही कारणांमुळे शोमधून बाहेर पडले आहेत. तर भारती दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काही नवीन कलाकारांना घेण्यात आलं आहे. यामध्ये सृष्टी रोडे, गौरव दुबे आणि सिद्धार्थ सागर यांच्यासह आणखी काही नावांचा समावेश आहे.

आणखी वाचा- चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबासह अक्षय कुमार लंडनला रवाना, पत्नी परदेशातच राहणार कारण…

दरम्यान अक्षय कुमारबद्दल बोलायचं तर, या वर्षी त्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी ३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘रक्षाबंधन’ या तिनही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. त्यानंतर अक्षयने अचानक त्याचा चौथा चित्रपट ‘कटपुतली’ ओटीटीवर प्रदर्शित केला, ज्यामुळे सर्वच चकीत झाले होते कारण हा चित्रपट अगोदर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.

Story img Loader