‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. या शोचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. पण आता कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ काही वेळासाठी तरी सोनी टिव्ही वाहिनीवर प्रसारित होणार नसल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारा हा शो पुढील काही दिवस तरी प्रसारित होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा – अभिनेत्रीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे बोनी कपूर ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

पण हा शो प्रसारित न होण्यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल. तर कपिल आणि कपिलची या शोमधील संपूर्ण टीम अमेरिका येथे एका कामानिमित्त जाणार आहे. म्हणूनच या सगळ्या कलाकारांनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे. हा शो सुपरहिट होण्यामागे कपिलसह त्याच्या संपूर्ण टीमचाही सिंहाचा वाटा आहे. पण पुन्हा एकदा या सगळ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी काही दिवस प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’चे यापूर्वी दोन सीझन प्रदर्शित झाले. हा या शोचा तिसरा सीझन होता. ५ जून रोजीच या शोच्या तिसऱ्या सीझनचा शेवटचा भाग प्रसारित झाला. कपिलच्या या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. फक्त कलाक्षेत्रातीलच नव्हे तर क्रिकेट विश्वातील काही मंडळींनी देखील कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. कपिलचा हा शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला.

आणखी वाचा – ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतचं एक पाऊल मागे?, नव्या चित्रपटाबाबत निर्मात्यांचं स्पष्टीकरण

आपल्याच शोमधील कलाकारांशी झालेले मतभेद तसेच काही कलाकारांबरोबर कपिलचे वाद होते. मात्र काळानुसार वादग्रस्त वातावरणामधून कपिल बाहेर पडला आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर सारख्या कलाकारांनी प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. आता पुन्हा हा शो कधी परतणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

Story img Loader