सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. पण फक्त एकाच भूमिकेचा तिरस्कार केला जात आहे आणि तो म्हणजे फारुख मल्लिक बिट्टाच्या भूमिकेचा. हे भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर याने साकारली आहे. सोशल मीडियावर चित्रपट आणि त्यातील भूमिकांचे खूप कौतुक होत असताना चिन्मयला सतत द्वेषयुक्त मेसेज आणि कमेंट केल्या जात आहेत. याविषयी त्याची प्रतिक्रिया काय आहे याचा खुलासा चिन्मयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिन्मयने नुकतीच ‘आजतक’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने चित्रपट कसा मिळाला यावर वक्तव्य केलं आहे. चित्रपटाविषयी चिन्मय म्हणाला, “जेव्हा विवेक अग्निहोत्री सरांनी या भूमिकेसाठी मला कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. मी मराठी आहे आणि माझ्या मूडच्या अगदी विरुद्ध असलेल्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. त्यांनी मला या लायक समजलं याचा आनंदही होता. कास्टिंगचे सर्व श्रेय पल्लवी जोशीला जाते. पहिली ऑडिशन घेतलं आणि मला हा चित्रपट मिळाला.”

आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video

आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?

चिन्मय त्याच्या भूमिकेविषयी म्हणाला, “जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा लोकांची आता चित्रपट पाहिल्यानंतर जी प्रतिक्रिया आहे तशीच माझी प्रतिक्रिया होती. मला त्याच वेळी माझ्या भूमिकेविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. माझी भूमिका खूप क्रूर आहे हे मला माहीत होते. चित्रपटाला जो संदेश सगळ्यांना द्यायचा होता त्यावर आधारित माझी भूमिका क्रूर असायला हवी होती. चित्रपटाची पटकथा ही सत्यघटणेवर आधारित आहे. अनेक भूमिका वास्तविक जीवनातील लोकांपासून प्रेरित आहेत.”

आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का

चिन्मय चित्रपटाला मिळणाऱ्या कमाई विषयी म्हणाला, “चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. काश्मीर फाइल्सच्या सक्सेसबद्दल मी विचार करत होतो, की कदाचित दोन ते तीन आठवड्यांनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात त्याची पकड मजबूत करेल. तर पहिल्या रात्रीपासूनच या चित्रपटाने कमालीची कमाई केली.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kashmir files actor chinmay mandlekar who plays farooq malik bitta how he got the role dcp