सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. विवेक अग्नीहोत्री यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विवेक अग्नीहोत्रींची पत्नी पल्लवी जोशी यांच्याविरोधात काश्मीरमध्ये फतवा काढण्यात आला होता. पण एक घटना अशी घडली की ज्याने पल्लवीला धक्का बसला.
पल्लवी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये जेएनयूच्या प्राध्यापक राधिका मेननची भूमिका साकारत आहे. राधिका मेनन या चित्रपटात विद्यार्थ्यांना ‘आझाद काश्मीर’साठी लढण्यासाठी प्रेरित करते. एका पत्रकार परिषदेत पल्लवीने काश्मीरमध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता.
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?
पल्लवी म्हणाली, “एक दिवस एक ४ ते ५ वर्षांची मुलगी माझ्याकडे आली आणि माझ्यासोबत खेळल्यानंतर तिने मला विचारले की मी नमाज पठण करण्यासाठी कधी जाणार आहे. मी म्हणाले की मी हिंदू आहे, म्हणून मी नमाज पठण करत नाही. मग ती मुलगी म्हणाली, तुम्ही नमाज पठण करायला हवे कारण ते आवश्यक आहे. मला धक्काच बसला कारण त्या लहान मुलीला इतर धर्म आहेत हे माहीत नव्हते. तिथे कोणत्या प्रकारचे कट्टरतावाद घडत आहे याचा विचार करा. ते खूप धोकादायक आहे.”
आणखी वाचा : RRR च्या नव्या गाण्यात दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची झलक! पाहा Video
चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारण्याविषयी पल्लवी पुढे म्हणाली, “तिला सत्य समोर आणायचे होते.” तर, पल्लवी अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाली, “काश्मीरमध्ये तिच्या आणि पती विवेक अग्नीहोत्रीविरोधात फतवा काढण्यात आला. त्यावेळी ते चित्रपटाच्या शेवटच्या सीनचे शूटिंग करत होते. पण विवेक आणि पल्लवीने हे सर्व कलाकार आणि क्रूला सांगितले नाही कारण यामुळे त्यासगळ्यांचे लक्ष विचलित झाले असते आणि ते त्यांना नको होते.”
आणखी वाचा : Viral Video : वधू-वर एकमेकांना हार घालत असताना, अचानक आला नवरीचा पहिला प्रियकर अन्…
दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.