२०२२ मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आहे. १९९०मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सातत्याने ते बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका करत असतात.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावरून नुकताच एक वाद निर्माण झाला होता. दिग्दर्शक अनुराग कश्यपने एका मुलाखतीत असे सांगितले की ‘यावर्षी जर भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जर ‘RRR’ चित्रपट पाठवला तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं’. त्याच्या या वक्तव्यावरच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले होते. आता ऑस्कर वादावरून विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा

काश्मीर फाईल्सच्या ऑस्करवारीवर ती हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘तुमचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, तर तुम्हाला बरे वाटेल. त्याचप्रमाणे, जेव्हा कोणी म्हणते की तुमचा चित्रपट ऑस्करला गेला पाहिजे, तेव्हा मला खूप आनंद होतो’. त्या पुढे म्हणाल्या, ‘या चित्रपटात राजकीय विधानं केली आहेत जी कदाचित काही लोकांना पटणार नाहीत. मत भिन्न असणे हे चांगल्या लोकशाहीचे उदाहरण आहे. पुरस्कार हा चित्रपटातील गुणवत्तेबद्दल, उत्कृष्टतेबद्दल आणि त्रुटींबद्दल असतो. त्यानुसार चित्रपटाला न्याय द्या, बाकी कोणत्या गोष्टी त्यामध्ये आणू नका, अशी एकच माझी विनंती आहे’.

पल्लवी जोशी अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अगदी बालकाकलाकार असल्यापासून त्यांनी मालिका चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. झी मराठीवरील ‘सारे ग म प’ सारख्या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. तसेच ‘असंभवसारख्या’ मालिकेची निर्मिती देखील केली होती. आपल्या पतीच्या ‘ताशकंद फाईल्स’ चित्रपटात त्यांनी काम केले होते.

‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली.‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट लोकांना आवडला, तर काहींना त्यावर टीकाही केली.

Story img Loader