बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचं आणि अनुपम यांचं कौतुक होतं आहे. या सगळ्यात अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुपम यांचे कौतुक केले आहे.
अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षयने अनुपम यांचं एक ट्वीट रिट्वीट केले आणि म्हणाला, “द काश्मीर फाईल्स या चित्रपटात तुमच्या अभिनयाबद्दल अनेक अविश्सनीय गोष्टी ऐकल्या. प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात परतताना पाहून आश्चर्य वाटले. लवकरच चित्रपट पाहण्याची आशा आहे. जय अंबे”, असे ट्वीट अक्षयने केले आहे.
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांची कहाणी जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. आता हे सगळं पाहता अनेक प्रेक्षक हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे अनेक प्रेक्षक विचारत आहेत. तर लवकरच हा चित्रपट आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले. स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना हे २५ जानेवारी १९९० मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मु काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.