विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं आता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रमही तोडला आहे.
शुक्रवारी अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईमध्ये अजिबात घट झालेली नाही. विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या चित्रपटानं प्रदर्शनाच्या ८ व्या दिवशी देखील सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करतानाच एकूण ११६.४५ कोटींची कमाई केली आहे.
आणखी वाचा- ‘देसी गर्ल’चं परदेशातही धम्माल होळी सेलिब्रेशन, निक- प्रियांकाचा रोमँटीक Video Viral
सामान्यतः कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यानंतर कमाईमध्ये घट होताना दिसते. पण ‘द कश्मीर फाइल्स’च्या बाबतीत मात्र असं घडलेलं नाही. या चित्रपटाने आठव्या दिवशी आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई केली आहे. म्हणजेच १० दिवसांत १६० कोटींच्या आसपास या चित्रपटाची कमाई होऊ शकते. हा चित्रपट सर्वात ब्लॉकबस्टर मानला जातोय कारण याचं बजेट केवळ १५ कोटी रुपये एवढं आहे.
आतापर्यंत आमिर खानचा ‘दंगल’ आणि प्रभासच्या ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या चित्रपटांनी आठव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. दंगल चित्रपटानं आठव्या दिवशी १८.५९ कोटी रुपये एवढी कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटानं ११६.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आणखी वाचा- Video : …अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं
दरम्यान विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका आहेत.