बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.

या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. या चित्रपटाने तीन दिवसात तब्बल ३१.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याची माहिती देत दर्शनने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानले आहे. दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने चौथ्या दिवशी १२. ६८ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : The Kashmir Files पाहायचाय? आता ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांची कहाणी जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. आता हे सगळं पाहता अनेक प्रेक्षक हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे अनेक प्रेक्षक विचारत आहेत.

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले. स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना हे २५ जानेवारी १९९० मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मु काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.