विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कथा समोर आणण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी १० रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून यात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केला. हरियाणासह इतर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. परंतु यादरम्यान, काँग्रेस मात्र या चित्रपटावर टीका करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘द कश्मीर फाइल्स बनवण्याचा उद्देश काश्मीरी पंडीतांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणारे भाजपासंबंधित, हा योगायोग नाही. पंडीतांनी काश्मीरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे. देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहते.’

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

सावंत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सिनेमागृहातून चित्रपट पाहून बाहेर पडलेले प्रेक्षक मोठमोठ्याने जय श्री रामच्या घोषणा देताना दिसत आहेत. यावर सावंत म्हणाले, ‘”जय श्रीराम” घोषणा द्या. पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही व कैकेयीला क्षमा केली हे पहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग हा नव्हे!’

सावंत पुढे म्हणाले, ‘जर आठवणच ठेवायची तर ही जरुर ठेवा की पंडितांचे काश्मीरमधून अत्याचारांमुळे जबरदस्तीने विस्थापन झाले त्यावेळी केंद्रात भाजपा समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होते व जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती व तेथील राज्यपाल जगमोहन पुढे भाजपाचे चार वेळा खासदार व केंद्रीय मंत्री झाले.’ अशाप्रकारे सचिन सावंत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; म्हणाले, “मी कधीही…”

केरळ काँग्रेसनेही रविवारी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी काही खळबळजनक तथ्ये सादर केली होती. यात त्यांनी म्हटलं होत की, ‘ज्यांनी पंडितांना लक्ष्य केले ते अतिरेकी होते. १९९० पासून २००७ पर्यंत १७ वर्षात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ३९९ पंडितांची हत्या झाली. याच काळात या अतिरेक्यांनी १५ हजार मुस्लिमांची हत्या केली. खोर्‍यातून काश्मिरी पंडितांचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या सूचनेवरून झाले, जे आरएसएसचे होते.’ केरळ काँग्रेसने केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. लोकांनी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले. यानंतर काँग्रेसने हे ट्विट डिलीट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kashmir files congress criticizes bjp over kashmiri pandits pvp