बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांचा द काश्मिर फाईल्स हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. त्यामुळे प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच चित्रपटातील एक सीन हटवण्यात आला आहे. खरतरं हा चित्रपट काश्मिर पंडितांच्या विषयावर आधारीत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर द काश्मिर फाईल्सची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात असलेलेल दिवंगत आयएएफ स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना यांच्यावर आधारित दृश्यांवर संशोधन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मिर फाईल्स हा चर्चेत आला आहे. यापूर्वी दिवंगत रवि खन्ना यांच्या पत्नी निर्मला यांनी कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी आपल्या पतीविषयक जी दृष्ये चित्रित करण्यात आली आहे ते हटविण्याची मागणी केली होती. सत्य परिस्थितीशी तडजोड करुन काल्पनिकतेचा आधार घेऊन मनोरंजकता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप निर्मला यांनी केला.
आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी
आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेस परिधान केल्यामुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल
चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले. स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना हे २५ जानेवारी १९९० मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मु काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.