बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.
विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांत या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवसाअखेर या चित्रपटानं एकूण ६० कोटी रुपयांची कमाई केली.
आणखी वाचा- ‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर! मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४७. ८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ५ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पाचव्या दिवशी चित्रपटानं सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे ६० कोटी रुपये एवढं झालं आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये होणारी वाढ पाहता हा चित्रपटच लवकरच १०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल अशी आशा आहे.
आणखी वाचा- शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. १२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं. तसेच या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या या चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.