मागच्या काही दिवसांपासून लीना मणिमेकलाई आणि त्यांचा माहितीपट ‘काली’च्या पोस्टरमुळे झालेला वाद सतत चर्चेत आहे. पोस्टरवरून झालेल्या वादानंतर लीना मणिमेकलाई यांनी देखील काही वादग्रस्त ट्वीट केले आहेत. लीना मणिमेकलाई यांच्या ट्वीटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिली होती. या वादावर आता ‘द कश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत लीना मणिमेकलाई यांचं ट्वीट रिट्विट करत लीना यांना सुनावलं आहे.

काही दिवसांपूर्वीच लीना मणिमेलाई यांनी एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी कालीमातेला क्वीर म्हटलं होतं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “माझी काली क्वीर (Queer) आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताकतेवर थुंकते. ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते. ती भांडवलशाहीचा नाश करते आणि तिच्या हजार हातांनी ती सर्वांना आशीर्वाद देते.”

आणखी वाचा- लीना मणीमेकलाई यांचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट, कालीमातेला म्हटलं ‘क्वीर’

विवेक अग्निहोत्री यांनी लीना मणिमेकलाई यांचं हे ट्वीट रिट्वीट करताना लिहिलं, “कृपया, कोणी असं आहे जे या मूर्खांना थांबवू शकेल.” या सोबत त्यांनी काही इमोजी सुद्धा पोस्ट केल्या आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या अगोदर भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील लीना मणिमेकलाई यांना मूर्ख म्हटलं होतं. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, “लीना मणिमेकलाई यांच्यासारख्या लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवायला हवं” असं म्हटलं होतं.

दरम्यान लीना यांच्या ‘काली’ माहितीपटाच्या ज्या पोस्टवरवरून वाद सुरू झाला आहे. त्या पोस्टरवर कालीमातेच्या अवतारात एक महिला सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. याशिवाय तिच्या हातात LGBTQ समुदयाला समर्थन देणारा सप्तरंगी झेंडा आहे. लीना मणीमेकलाई यांनी २ जुलैला ट्विटरवर त्यांच्या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. हे पोस्टर कॅनडाच्या आगा खान म्यूझियममधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलं होतं. या पोस्टरवर कॅनडामधील हाय कमिशननं नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला. यानंतर लीना यांच्या माहितीपटाचं पोस्टर ट्विटरनं ब्लॉक केलं होतं.

Story img Loader