कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. आधी कन्नड आणि नंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. तब्बल १७० कोटीहून अधिक कमाई करणारा हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे कर्नाटक सरकारनेही ‘दैव नर्तकांना’ विशेष भत्ता देण्याचं जाहीर केलं आहे. दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीचंही खूप कौतूक होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही या चित्रपटाचं कौतूक केलं. तिने चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीचं कौतूक करत एक व्हिडिओ शेअर केला होता. बऱ्याच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनी या चित्रपटाची दखल घेतली आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं कौतूक केलं आहे. आपल्या असिस्टंटबरोबर अग्निहोत्री यांनी चित्रपट पाहिला आणि घरी परतत असताना त्यांनी गाडीतच व्हिडिओ शूट केला.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

आणखी वाचा : “साडी तू स्वतः नेसलीस का?” लेकीचा ग्लॅमरस लूक पाहून शाहरुख खानने विचारला प्रश्न, सुहाना म्हणाली…

हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शक रिषभ शेट्टी याला खूप शुभेच्छा दिल्या. विवेक अग्निहोत्री म्हणाले, “हा चित्रपट पाहून एक वेगळाच अनुभव गाठीशी आला आहे, मीतरी आजवर असा चित्रपट पाहिलेला नाही. रिषभ तू फारच उत्तम काम केलं आहेस, मी उद्या तुला फोन करून शुभेच्छा देणार आहेच पण मला आत्ता रहावलं न गेल्याने मी माझा हा अनुभव शेअर करत आहे. चित्रपटातील लोककला ही अत्यंत आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे, खासकरून क्लायमॅक्स हा अविस्मरणीय आहे. माझी लोकांना नम्र विनंती आहे की दिवाळी झाल्यावर तातडीने हा चित्रपट बघा. मला हा चित्रपट पुन्हा बघायला आवडेल. रिषभ शेट्टीला मनापासून सदिच्छा.”

विवेक अग्निहोत्री यांच्या प्रतिक्रियेला लोकांनी भरभरून दाद दिली आहे. ‘कांतारा’ची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.

Story img Loader