Modi Birthday Special : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२वा वाढदिवस. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मंडळी त्यांना शुभेच्छा देत आहेत. कलाक्षेत्रामधील काही मंडळींनी देखील नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरद्वारे खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक अग्निहोत्री यांचा खास व्हिडीओ

“मनापासून मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्यांना दिर्घायुष्य लाभो तसेच नेहमी निरोगी राहो हिच देवाचरणी प्रार्थना करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये एक नवा उत्साह निर्माण केला तसेच भारतीयांचे मनोबल वाढवलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.”

याच उत्साहाने भारतीयांसाठी तसेच भारतामधील तरुण आणि इतर लोकांसाठी काम करत राहावं. तुम्हाला थोरल्यांचा आशिर्वाद, भारतीयांकडून खूप सारं प्रेम. जगभरात भारत देशाचं नाव अधिक पुढे नेण्यासाठी तुम्हाला ताकद मिळो.” अशा शब्दांमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – PM Modi Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

विवेक अग्निहोत्री यांचा हा व्हिडीओ अधिकाधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader