काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित असलेला चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल असं बोललं जातंय. चित्रपट पाहिल्यावर अनेक सेलिब्रेटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात आता करणी सेनेनंही या चित्रपटावर भाष्य केलं आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे एक छोटासा आग्रह केला आहे.

करणी सेनेनं झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आग्रह केला आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून होणाऱ्या कमाईतील ५० टक्के हिस्सा हा काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल अम्मू म्हणाले, ‘बऱ्याच राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ज्यामुळे सामान्य माणसांना सहजपणे चित्रपट पाहता यावा. तर मग आता निर्माता आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन या चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम ही विस्थापित काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी द्यावी.’

AR Rahman And Saira Banu Divorce
घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट; म्हणाले, “३० वर्षे पूर्ण करू अशी आशा होती, पण…”
AR Rahman And Saira Banu Part Ways After 29 Years Of Marriage
AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला;…
shah rukh khan announces son Aryan khan debut Netflix bollywood as director
२०२५ साठी शाहरुख खानची मोठी घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, तर पत्नी गौरी…; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Navri Mile Hitlarla
Video : एजे आणि लीला आमने-सामने उभे राहणार; नक्की कोण जिंकणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो
pushpa 2 digital rights
प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे
lakhat ek aamcha dada
Video: शत्रूच्या ‘त्या’ कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या; म्हणाला, “तेजूच्या नावापुढं…”
shah khan cry when movie get failure
शाहरुख फक्त ‘या’ एकाच ठिकाणी रडतो; स्वत: केला खुलासा, म्हणाला, “जेव्हा तुम्ही अपयशी होता…”
bhagare guruji son akhilesh bhagare unseen video viral
Video: हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी अन् बरंच काही…; भगरे गुरुजींच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातील Unseen व्हिडीओ पाहा
55th iffi festival lampan directed by nipun dharmadhikari in best web series competition
५५ वा इफ्फी महोत्सव : सर्वोत्कृष्ट वेब मालिकांच्या स्पर्धेत निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’

आणखी वाचा- “…अन् तिथेच सर्व बिघडलं” ब्रेकअप आणि डिप्रेशनवर पहिल्यांदाच बोलला प्रतीक बब्बर

अम्मू पुढे म्हणाले, ‘जर निर्माता आणि दिग्दर्शक असं करण्यात अयशस्वी ठरले तर हे मानलं जाईल की, त्यांनी फक्त या लोकांच्या वेदना आणि जखमा पुन्हा एकदा ताज्या करण्यासाठीच हा चित्रपट तयार केला. या चित्रपटातून त्या लोकांचं कल्याण व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं किंवा त्या लोकांच्या वेदनांची त्यांना अजिबात काळजी नव्हती.’

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान आतापर्यंत या चित्रपटानं ८७.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.