आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढालादेखील’ बॉयकॉट करण्यात आले होते. सध्या ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेंडवर बॉलिवूडमधील कलाकार आपापली मतं व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बॉयकॉट बाबतीत आपले मत मांडले आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘काहीही झाले तरी चित्रपट बनणार नाहीत अशी परिस्थिती नाही. जोपर्यंत चित्रपट बनत आहेत तोपर्यंत लोकांना मोबदला मिळेल. अर्थातच, पुन्हा एक साथीचा रोग आला तर सर्व काही ठप्प होईल. तुम्ही चित्रपटसृष्टीला कुलुपात बंद करू शकत नाही. हा अतिशय युटोपियन विचार आहे. असे कधी झाले नाही आणि होणारदेखील नाही’.

ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर भडकले, म्हणाले “मला ऑर्डर करू… “

चित्रपटांच्या खराब कामगिरीमुळे तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्सवर परिणाम होतो या युक्तिवादाबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले की, ‘खरं तर असे म्हणायचे की आमच्या चित्रपटांवर काम करणार्‍या २५० लोकांचा विचार करा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे काय, हा चुकीचा युक्तिवाद आहे. त्यांना आधीच पैसे दिलेले असतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, फक्त निर्माता, वितरक आणि प्रदर्शक अडकतात. अभिनेते, तंत्रज्ञ, सर्व रोजंदारी कामगारांना तोपर्यंत पगार मिळालेला असतो’.

पल्लवी जोशी या अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटात त्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली होती. अगदी बालकाकलाकार असल्यापासून त्यांनी मालिका चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. झी मराठीवरील ‘सारे ग म प’ सारख्या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. तसेच ‘असंभवसारख्या’ मालिकेची निर्मिती देखील केली होती. आपल्या पतीच्या ‘ताशकंद फाईल्स’ चित्रपटात त्यांनी काम केले होते.