देशभरामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच आता या चित्रपटासंदर्भातील भूमिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. शरद पवार यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलीय. फडणवीस नागपूर विमानतळावर पोहचले असता पत्रकारांनी त्यांना शरद पवारांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.

नक्की वाचा >> “ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. “‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजपा चुकीचा प्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत आहे,” असा अत्यंत गंभीर आरोप पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं. शालेय अभ्यासक्रमातून भाजपा लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. “काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली; सोमय्या म्हणाले, “आजपासून…”

काश्मिरी पंडितांची काळजी असती तर…
“‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजपा धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपाचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत,” अशी टीका पवार यांनी केली. ”मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे,” असा टोला पवारांनी लागवला.

नक्की वाचा >> फडणवीसांविरोधात याचिकेमुळे चर्चेत आलेल्या उके वकिलांविरोधीतील ED च्या कारवाईवर फडणवीस म्हणतात, “२००५ पासून…”

फडणवीसांनी दिलं उत्तर…
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायला नको होता, असं शरद पवार म्हणाल्याचं सांगत यावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी हसून, “अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्संख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागलीय त्यातून अशी वक्तव्य येतायत,” असा टोला लगावलाय.