सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. १९९० च्या दशकातील १९८९-९० मध्ये काश्मीरमधील पंडित आणि हिंदूवर झालेल्या आत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, किती अडचणी आल्या या विषयी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
विवेक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत हा किस्सा सांगितला आहे. चित्रपटातल्या भारतविरोधी घोषणा आणि पंडितांवर मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेले अनन्वित आत्याचार यासगळ्याचा बरेच लोकं सध्या विरोध करत आहेत. चित्रपटातील भारताविरोधी घोषणेचा हा सीन शूट करताना त्यावेळी स्थानिकांनी काहीकाळासाठी शूटींग रोखल्याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे. विवेक त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले, “काश्मीर फाइल्सच्या शूटिंगदरम्यानची खरी घटना, काश्मीर फाइल्सच्या सुरुवातीचा सीन, ज्यामध्ये फारुख अहमद बिट्टाने भारतविरोधी घोषणा दिल्या. हा सीन देहरादूनमध्ये शूट करण्यात आला होता. दहशतवादी बिट्टाची व्यक्तिरेखा चिन्मय मांडेलकरने साकारली होती आणि शूटिंगदरम्यान देहरादूनचे स्थानिक लोक त्याच्या जवळ होते,” असे विवेक म्हणाले.
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का
शूटिंग थांबवण्यावर लोकांच्या विरोधाविषयी सांगताना विवेक म्हणाले, तिथल्या स्थानिक लोकांनी आनंदाने शूटिंगमध्ये भाग घेतला, पण स्क्रिप्टमध्ये असलेल्या देशविरोधी घोषणा ऐकून लगेचच त्यांनी चित्रपट निर्मात्याकडे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांना सर्वांना समजावून सांगावे लागले की हा चित्रपट भारताच्या विरोधात नाही. चिन्मय मांडेलकर यांनी त्यांना त्यांच्या मराठी चित्रपटांची झलक दाखवली ज्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. यानंतर अखेर स्थानिक लोकांनी शूटिंगला परवानगी दिली आणि खास चिन्मयने शूटिंग संपताच सर्वप्रथम भारत माता की जयचा नारा दिला.”
आणखी वाचा : “आम्हाला आता माहित झालं…”, अमिताभ यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर केली Cryptic पोस्ट?
दरम्यान, चिन्मयने या चित्रपटात बिट्टाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे.