५ मे २०२३ रोजी हॉलिवूडच्या मार्व्हल कॉमिकचा बहुचर्चित ‘गार्डीयन्स ऑफ द गॅलेक्सी ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याबरोबरच बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांनी ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गर्दी केली. वादात अडकल्यामुळे या चित्रपटासाठी बरेच लोक उत्सुक होते. या भारतीय चित्रपटाने चक्क हॉलिवूडच्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

भारतीय चित्रपट इतिहासात बहुतेक ही गोष्ट प्रथमच घडत आहे. ‘द केरला स्टोरी’ने मार्वलच्या या बिग बजेट चित्रपटाला बॉक्स ऑफिस कमाईत मागे टाकलं आहे. ‘गार्डीयन्स ऑफ गॅलक्सि’च्या पहिल्या दोन्ही भागांना भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या तिसऱ्या भागालाही प्रतिसाद चांगला मिळाला आहे, पण कमाईच्या बाबतीत ‘द केरला स्टोरी’पेक्षा काहीच आकड्यांनी हा चित्रपट मागे पडला आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
allu arjun pushpa 2 trailer release
Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nikhil Rajeshirke
‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेता निखिल राजेशिर्के अडकला लग्नबंधनात

आणखी वाचा : ‘जवान’ आणि ‘ॲनिमल’ येणार आमने सामने; रणबीर कपूरने केली शाहरुख खानला रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती?

‘अव्हेंजर्स एंडगेम’, ‘अवतार २’ तर ‘स्पायडर मॅन होम कमिंग’ या तीनही चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. त्यामानाने ‘गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी ३’ हा चित्रपट तेवढी कमाल दाखवू शकलेला नाही. ‘गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी ३’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.३० कोटींची कमाई केली आहे तर ‘द केरला स्टोरी’ने पहिल्याच दिवशी ७.५० कोटींची कमाई केली आहे.

तब्बल २० लाखांनी मार्वलच्या बिग बजेट चित्रपटाला मागे टाकत ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द केरला स्टोरी’ने कित्येकांच्या तोंडं बंद केली आहेत. कोणालाही कसलीच अपेक्षा नसताना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाल करून दाखवली आहे. येत्या काळात ‘गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी काही शो हे ‘द केरला स्टोरी’लाही मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी ‘द केरला स्टोरी’ची निर्मिती केली आहे.