अॅनिमेशनपटांकडे केवळ लहान मुलांचे चित्रपट म्हणूनच पाहिले जाते. भारतीय सिनेसृष्टीत कार्टून किंवा अॅनिमेशनपट तयार करण्याची परंपरा नाहीच, परंतु जर कोणी असे चित्रपट पाहण्याचे धाडस करत असेल तर त्यात काय पाहण्यासारखे?, असा खोचक प्रश्न विचारून त्याला मागे खेचण्यातच धन्यता मानणारे अनेक तथाकथित बुद्धिजीवी चित्रपट समीक्षक आपल्या सभोवताली दिसतात. परंतु ‘टॉय स्टोरी’, ‘कोको’,‘अॅलिटा: बॅटल एंजेल’, ‘रॅटाटय़ुल’, ‘कुंग फू पांडा’, ‘अप’ यांसारख्या अनेक दर्जेदार अॅनिमेशनपटांनी या मंडळींचा वारंवार भ्रमनिरास केला आहे. या प्रयत्नांत डिस्ने कंपनी अग्रेसर आहे. गेल्या काही काळात त्यांनी ‘द इन्क्रेडिबल्स’, ‘राल्फ ब्रेक्स द इंटरनेट’, ‘ब्युटी अँड द बिस्ट’, ‘अल्लाउदीन’, ‘जंगल बुक’ असे सलग चित्रपट प्रदर्शित केले आहेत. त्यांचा हा नव्याने सुरू झालेला खटाटोप पाहिल्यावर ते जणू एखाद्या मोहिमेवरच असल्याचा भास होतो. डिस्नेने आपल्या जुन्या क्लासिक अॅनिमेशनपटांना पुन्हा एकदा लाइव्ह अॅक्शन फॉर्ममध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारात गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटाने विशेष लोकप्रियता मिळवली. ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या या चित्रपटाने अॅनिमेशनपटांना हिणवणाऱ्या समुदायास सणसणीत चपराक मारली असे म्हणता येईल, परंतु डिस्ने एवढय़ावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ‘द लायन किंग’ हा लाइव्ह अॅक्शनपट प्रदर्शित करून सिनेतंत्रज्ञान जगात आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.
The Lion King : संगणकीय अद्भुत आविष्कार
‘द लायन किंग’ हा लाइव्ह अॅक्शनपट प्रदर्शित करून सिनेतंत्रज्ञान जगात आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2019 at 22:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lion king live action movie mppg