आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेल्या ‘दी लंचबॉक्स या भारतीय चित्रपटाची ‘ब्रिटीश अॅकेडमी फिल्म अॅवॉर्डस् २०१५’च्या (बीएएफटीए) परदेशी भाषेतील चित्रपटाच्या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे. ‘बाफ्टा’च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार निम्रत कौर आणि इरफान खानचा अभिनय असलेल्या या चित्रपटाची पोलीश-डॅनिश चित्रपट ‘आयडा’, रशियन चित्रपट ‘लेविआथन’, ब्राझिलियन-ब्रिटीश चित्रपट ‘ट्रॅश’ आणि बेल्जियन चित्रपट ‘टू डेज, वन नाईट’ या चित्रपटांशी स्पर्धा आहे. रितेश बत्रा दिग्दर्शित ‘दी लंचबॉक्स’ चित्रपटात प्रेमासाठी आसुसलेली गृहिणी आणि एकटेपणाचे जिवन कंठत असलेल्या व्यक्तीमधील प्रेम कहाणी अत्यंत खुबीने दर्शविण्यात आली आहे. २०१३ साली भारतात प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४ साली ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक निर्माते असलेल्या या चित्रपटाने कान, झुरीच, लंडन आणि टोरांटोसह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा