गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत होता. त्याचा चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते. अनेकांनी या चित्रपटातली गाणी गात त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या सगळ्यात आता ‘सामी सामी’ या गाण्याचं मराठी व्हर्जन समोर आलं आहे. हे व्हर्जन चक्क एका लहान मुलीने गायलं आहे.
पुष्पा चित्रपटातील ‘सामी सामी ‘गाण्यावर अभिनेत्री रश्मिका मंदानाने डान्स केला होता. या तेलगू गाण्याचे हिंदी व्हर्जन तर सगळ्यांनीच ऐकलं. आता या गाण्याचं मराठी व्हर्जन समोर आलं आहे. या मुलीने गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या मुलीचे सगळीकडे प्रचंड कौतुक केले जात आहे. हे गाणं ज्या मुलीने गायलं आहे तिचं नाव अनन्या मंगेश मोहोड आहे.
आणखी वाचा : “मराठी आहात तर मराठीतच बोलूया…”, अक्षय कुमारच्या फोन संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.