बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि आयपीएलमुळे राज कुंद्रा हे नाव माध्यमात अनेकदा चर्चिले जाते. तर या राज कुंद्रा यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी चक्क बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानशी पंगा घेतला. त्याच झाले असे, एका प्रमुख दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या महाशयांनी आपले मासिक उत्पन्न हे सलमान खानला मिळणाऱ्या चित्रपटाच्या उत्पन्नापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे म्हणत सलमानबरोबर आर्थिक तुलना केली. मुलाखतीदरम्यान याविषयी केलेल्या टिपणीत कुंद्रा म्हणतात, मी पैजेने सांगतो सलमानचे उत्पन्न फार काही खास नाही… निदान माझ्या उत्पनाच्या जवळपास नक्कीच नाही. केवळ माझ्या पत्नीमुळे मी चित्रपटांची निर्मिती करीत असून, त्यायोगे चित्रपटसृष्टीचा भाग झालो आहे. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या या टिपणीवरून सलमान खानचे चाहते कमालीचे भडकले आहेत. त्यांनी राज कुंद्रा विरुद्धचा आपला संताप टि्वटरवर व्यक्त करण्यास सुरुवात केली. सलमानच्या संतापलेल्या चाहत्यांनी टि्वटरवरील पोस्टद्वारे राज कुंद्रावर निशाणा साधत त्याला चांगलेच झोडपून काढले. लवकरच सलमानचा ‘कीक’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. टि्वटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना राज कुंद्राने सलमान खानच्या ‘कीक’ या आगामी चित्रपटाच्या नावाचादेखील उल्लेख केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा