अभिषेक तेली

‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा आहे. जो इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठी भाषा तितकीच क्लिष्टही आहे. मी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अभिनय व दिग्दर्शनाच्या गडबडीत व्यवस्थितपणे शिकू शकलो नाही’ अशी कबुली देताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीपेक्षा मराठी भाषेत अधिक प्रभावी वाटला, असे मत अभिनेता रणदीप हुडा याने व्यक्त केले.  

Nagpur 3rd grad student Kashish Thakur sang poem earning appreciation from Bhuse during inspection
जेव्हा शिक्षण मंत्र्यांना चिमूकलीने ऐकवली कविता…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात! जयपूर महोत्सवात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
great leaders, Study , Haritatya ,
ऊब आणि उमेद : माझ्यातले हरितात्या…
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’

 ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बहुचर्चित चित्रपटाचा मराठी ट्रेलर पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी आणि सावकरप्रेमींनी हजेरी लावली होती. तसेच चित्रपटाचा दिग्दर्शक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीची म्हणजेच यमुनाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित होते. हा चित्रपट सध्या देशभरातील चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या गावखेडय़ात आणि  देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या उद्देशाने मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित केला आहे’, अशी माहितीही रणदीप हुडा यांनी दिली.

रणदीप हुडा यांनी या चित्रपटात सावरकरांची भूमिका केली आहे आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. या निमित्ताने सावरकरांचा समग्र अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा साकारत असताना त्या व्यक्तिरेखेसारखे हुबेहूब दिसणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. तरच प्रेक्षक ती कलाकृती आवर्जून पाहतात. सावरकरांची भूमिका अचूक वठवता यावी यासाठी मी त्यांच्यावर आधारित साहित्यातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी होते. देशप्रेम ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे’, असेही रणदीप हुडा म्हणाले. यावेळी रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थिदशेत फग्र्युसन महाविद्यालयाच्या ज्या वसतिगृहातील खोलीत राहत होते, त्या खोलीलाही भेट दिली आणि सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

‘सुबोध भावे उमदा कलाकार’

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला अभिनेता सुबोध भावे यांनी आवाज दिला आहे. सुबोध भावे हा एक उमदा कलाकार आहे. मराठी चित्रपटासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला आवाज कोण देणार? असे जेव्हा मला विचारले. तेव्हा माझ्या तोंडातून आपसूकच सर्वप्रथम सुबोध भावे यांचे नाव आले, असे रणदीप हुडा यांनी विशेष नमूद केले.

या चित्रपटाच्या दरम्यान माझ्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनाही कष्ट घ्यावे लागले, हे खरे आहे. कारण मी उपाशीपोटी काम करायचो, माझे वजन ३० किलोहून अधिक कमी झाले होते. सेटवर चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण यासाठी मोकळा वेळ मिळायचा आणि सर्वाचे खाऊन कधी होते, याची मी वाट पाहत बसायचो.

मी स्वत: काही खाऊ शकत नव्हतो, अशी आठवण रणदीप यांनी  सांगितली. रणदीपचा त्याकाळातील व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे.

रणदीपच्या म्हणण्याला दुजोरा देत ते सेटवर सुक्यामेव्याचा डबा घेऊन बसलेले असायचे, त्याशिवाय ते काही खात नव्हते. चित्रीकरणाच्या काळात ते खूपच बारीक झाले होते, अशी आठवण अंकिता लोखंडे हिने सांगितली. अंकिताने साकारलेल्या यमुनाबाईंच्या भूमिकेसाठीही तिच्यावर प्रेक्षकांकडून आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या सहकलाकारांकडून कौतुकाचा वर्षांव होतो आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी मी लेखन, दिग्दर्शन व अभिनय अशा विविध बाजू एकाच वेळी सांभाळल्या आहेत. परंतु आमची संपूर्ण टीम मोठी असल्यामुळे आणि सर्व सहकाऱ्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हा चित्रपट यशस्वीरीत्या पूर्ण झाला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांनी आयुष्याच्या प्रवासात खूप कष्ट घेतले, यातना सहन केल्या. त्यांच्यावर विविध आरोपही लावले गेले आणि त्यांना त्रास दिला गेला, त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल. असे अनेक विचार माझ्या मनात आले. त्यामुळे या भूमिकेची तयारीची प्रक्रिया खडतर होती, पण सतत सावरकरांनी देशासाठी घेतलेल्या कष्टांचा विचार मनात असायचा. –रणदीप हुडा

Story img Loader