यंदा मतदानाचा हक्क सर्वानी आवर्जून बजावण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्याही यंदा खूप होती. त्यामुळे अनेक मॉल्समध्येही योजना ठेवण्यात आल्या. व्हेक्टर प्रोजेक्ट्स निर्मित ‘सुराज्य’ या चित्रपटाच्या टीमनेह अशीच एक योजना आणली आहे. गुरुवारी मतदान केलेल्या प्रेक्षकांनी ‘लोकसत्ता’मधील सुराज्य चित्रपटाच्या जाहिरातीचे कात्रण आणि त्याखालील माहिती भरून नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन ‘सुराज्य’ चित्रपट पाहण्यासाठीची तिकीटे घ्यायची आहेत.
आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर मंदिरे, त्यांचे ट्रस्टे, मोठमोठाले मठ, धार्मिक सेवा आश्रम आहेत. त्यांच्याकडे  जमा होणारा मोठय़ा प्रमाणावरील निधी अनेकदा पडून राहतो, असा निधी लोकोपयोगी कामासाठी वापरला जावा असा संदेश प्रेक्षकांचे रंजन करत देण्याचा प्रयत्न ‘सुराज्य’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी केला आहे. वैभव तत्ववादी आणि मृणाल ठाकूर ही नवी कलावंत जोडी या चित्रपटाद्वारे लोकांसमोर आली आहे.
‘सुराज्य’ चित्रपटाच्या जाहिरातीच्या एका कूपनवर दोन तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

Story img Loader