गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता त्या दोघांनी लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी एक घर बघितल्याचे म्हटले जात आहे.

विकी आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून घराच्या शोधात होते आणि आता त्यांना त्यांच स्वप्नातील घर सापडलं आहे. त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. काही वृत्तांनी दिलेल्या वृत्तांनुसार, हे दोघे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे शेजारी असतील.

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

‘इंडिया दुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिअल-इस्टेट पोर्टलचे प्रमुख वरुण सिंग म्हणाले, “विकीने जुहूच्या राजमहल या इमारतीमध्ये ६० महिन्यांसाठी म्हणजे ५ वर्षांसाठी एक अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. त्याने जुलै २०२१ पासून ८व्या मजल्यावरील अपार्टमेंट भाड्याने घेतले. सिक्योरिटी डिपॉजीट म्हणून विकीने १ कोटी ७५ लाख रुपये दिले आहे. सुरुवातीचे ३६ महिन्यांचे भाडे ८ लाख रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर पुढचे १२ महिने हे भाडं ८ लाख ४० हजार असणार आहे. तर पुढचे आणि शेवटच्या १२ महिन्यांचे भाडे हे ८ लाख ८२ हजार दरमहा असणार आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

दरम्यान, ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, १ डिसेंबर ते ७ डिसेंबरमध्ये ते दोघेही लग्न करतील असे म्हटलं जात आहे. या दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचेही बोललं जात आहे.

Story img Loader