जगभरात कुटुंब विनोदपटांचा ठरलेला एक साचा असतो. विनोदाचा अतिसोस ठेवण्यापलीकडे फारसे प्रयोग हे चित्रपट करताना दिसत नाहीत. त्यात कुटुंबातल्या तऱ्हेवाईक व्यक्तिरेखांच्या कर्तबगारीच्या किंवा अपकीर्तीच्या गोष्टींना भरपूर वाव दिला जातो. अपवाद म्हणून नावे घेता येतील अशा ‘लिटिल मिस सनशाइन’ नावाच्या गोजिऱ्या सिनेमामध्ये एका लहान मुलीला सौंदर्य स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी दूरच्या शहरात निघालेल्या कुटुंबातील तीन पिढय़ांपैकी प्रत्येकाची एक एक त्रांगडेबाज गोष्ट प्रवासभर उकलत राहते. दिग्दर्शक वेस अॅण्डरसन याच्या ‘रॉयल टिननबम’ या चित्रपटामध्ये कोकणी किंवा पुणेरी तिकडमपणाला मागे टाकणारे एकाच कुटुंबातील व्यक्तिसमूह कित्येक वर्षांनी वेगवेगळ्या कारणांनी एकत्र येऊन कथानकात धांदल उडविताना दिसतात. पारंपरिक कौटुंबिक चित्रपट नात्यांमधील हेवेदावे, राग-द्वेष यांच्या आधारे निवळू शकणाऱ्या तणावाची अल्पजाणीव करून प्रेक्षकाला गोड शेवटाकडे नेत टाळीफेक आणि ‘निखळ’ वगैरे ( विशेषणायुक्त पुरते) मनोरंजनाचा आनंद देतो. कौटुंबिक सिनेमा भारतीय असला, तर त्यात ‘संस्कार’, ‘पवित्रता’, ‘बुजूर्गोका सन्मान’, ‘कुर्निसात आणि नमन’ आदी ‘विनोदी’ गोष्टींचा मूळ विनोदी कथानकात अंतर्भाव केला जातो.
संगोपन विज्ञान!
जगभरात कुटुंब विनोदपटांचा ठरलेला एक साचा असतो.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2018 at 02:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The royal tenenbaums