The Sabarmati Report Movie Watched by PM Narendra Modi : गुजरातमध्ये २००२ साली घडलेल्या गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर बेतलेला द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून २२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा पुन्हा एकदा ऊहापोह होत आहे. गोध्रा प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर बरीच टीका झाली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता विक्रांत मेसीचा ह द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच चित्रपट निर्मात्याचं कौतुक केलं आहे. त्याच्या मेहनतीबाबत मोदींनी एक्सवरून पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दि साबरमती चित्रपट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांबरोबर पाहिला. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक आहे, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी केली.

हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”

अभिनेता विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. विक्रम भट या युजरने सदर चित्रपट पाहिल्यानंतर आपले मत व्यक्त केले असून प्रत्येकाने चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे. अलीकडच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या घटनेमागील खरे सत्य या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलता आणि जबाबदारीने हाताळला आहे. या घटनेत ५९ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. आज त्यांना योग्य श्रद्धांजली लाभली आहे.

२००२ साली गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातच्या अनेक भागात हिंसाचार उसळला होता. या घटनेवर सदर चित्रपट बेतलेला असून धीरज सरना यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sabarmati report movie watched by pm narendra modi reaction sgk