‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे. १९३८ साली जेरी सिगल आणि जो शुस्टर या दोघांनी मिळून ‘डीसी’ कॉमिक्ससाठी ‘सुपरमॅन’ ही व्यक्तिरेखा तयार केली. हवेत उडणारा हा सुपरमॅन निळ्या रंगाचे कपडे आणि त्यावर लाल रंगाची चड्डी घातलेला पोशाख परिधान करतो. तो डोळ्यातून लेझर बिन सोडतो, तोंडातून वादळ निर्माण करतो, एक्सरे व्हिजनच्या मदतीने भिंतीच्या पलीकडे पाहू शकतो. या शक्तींमुळे तो मोठमोठय़ा खलनायकांना चुटकीसरशी हरवतो. अन्यायाविरुद्ध लढणारा सुपरमॅन म्हणजे हिंमत आणि प्रेरणेचे प्रतीक होय. असा हा सर्वाचा लाडका सुपरहिरो केवळ कॉमिक्ससाठी तयार करण्यात आलेली एक काल्पनिक व्यक्तिरेखाच नाही तर आपल्यापैकी अनेकांचे बालपण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परंतु शक्तींचा अधिपती असलेला सुपरमॅन चित्रपटांमध्ये जशी धमाल करतो दुर्दैवाने तशी कमाल त्याला वास्तविक जीवनात करता येत नाही. असे म्हटले जाते की ‘सुपरमॅन’ हा एक शापित सुपरहिरो आहे. चित्रपटात सुपरमॅनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला असा एक शाप मिळतो की ज्यामुळे भविष्यात त्याला इतर कोणतीही भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही. सुपरमॅन साकारल्यानंतर काही दिवसांत त्याचा मृत्यृ तरी होतो किंवा अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात येते. आतापर्यंत असा अनुभव सुपरमॅन साकारणाऱ्या कर्क एलेन, जॉर्ज रीव्स, ख्रिस्तोफर रीव्स, ब्रँडन रुथ या चार अभिनेत्यांनी घेतला आहे.
कर्क एलेन
१९४८ साली सुपरमॅनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता कर्क एलेन यांनी सुपरमॅनची भूमिका वठवली होती. मोठय़ा पडद्यावर सुपरमॅन साकारणारे ते पहिले अभिनेता होते. जबरदस्त स्टंटबाजीने भरलेला हा पहिला सुपरहिरोपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे कर्क एलेन यांनी जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुपरमॅननंतर त्यांना ‘गॅम्बलिंग हाऊ स’ आणि ‘द मिरॅकिलस ब्लॅकहॅग’ या दोनच चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे दोन्ही चित्रपट ५०च्या दशकात तुफान गाजले होते, परंतु तरीही त्यानंतर मात्र अभिनेता कर्क एलेन यांना एकाही चित्रपटात काम मिळाले नाही. प्रत्येक दिग्दर्शक त्यांना काम देण्यास नकार देऊ लागला.
जॉर्ज रीव्स
कर्क एलेन नंतर अभिनेता जॉर्ज रीव्स यांनी सुपरमॅन व्यक्तिरेखा साकारली. १९५१ साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘सुपरमॅन अँड द मोल मॅन’ या चित्रपटानेही पहिल्या सुपरमॅनप्रमाणेच मोठे यश संपादित केले. परंतु या चित्रपटानंतर त्यांनाही काम मिळेनासे झाले. शेवटी नैराश्येच्या गर्तेत जाऊन त्यांनी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली.
ख्रिस्तोफर रीव्स
जॉर्ज रीव्स यांच्या मृत्यृनंतर अभिनेता ख्रिस्तोफर रीव्स यांनी सुपरमॅनची व्यक्तिरेखा सांभाळली. सुपरमॅन साकारणारे ते तिसरे अभिनेता होते. १९७८ साली त्यांच्या ‘सुपरमॅन’ या चित्रपटाने जबरदस्त यश संपादित केले. हे यश पाहून डीसी कंपनीने ख्रिस्तोफर रीव्स यांच्याच नावाखाली हे ‘सुपरमॅन – २’, ‘सुपरमॅन – ३’, ‘सुपरमॅन – ४’ या तीन चित्रपटांची एक मालिका तयार केली. या सुपरहिरोपट मालिकेने ख्रिस्तोफर रीव्स यांना रातोरात सुपरस्टार बनवले. परंतु पुढे त्यांचेही तेच झाले जे याआधी जॉर्ज रीव्स व कर्क एलेन यांचे झाले होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते घोडय़ावरून पडले आणि त्यांच्या पाठीचा कणा निकामी झाला. या अपघातामुळे तेदेखील नैराश्येच्या गर्तेत गेले आणि २००४ साली त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
ब्रँडन रुथ
ख्रिस्तोफर रीव्स यांच्या मृत्यृनंतर ‘सुपरमॅन’ ही एक शापित व्यक्तिरेखा आहे, ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता जिवंत राहात नाही अशा चर्चाना हॉलीवूड सिनेसृष्टीत उधाण आले. या चर्चामुळे अनेक मोठय़ा अभिनेत्यांनी सुपरमॅनची भूमिका साकारण्यास साफ नकार दिला, परंतु ब्रँडन रुथ यांनी या अफवांवर लक्ष न देता सुपरमॅन साकारण्यास होकार दिला. ‘द अमेझिंग स्टोरी ऑफ सुपरमॅन’ आणि ‘सुपरमॅन रिटर्न्स’ हे दोन चित्रपट त्यांनी केले. मात्र हे दोन्ही चित्रपट फसले. निर्मात्यांना या सुपरमॅनपटांमुळे कोटय़वधींचा तोटा झाला. या नुकसानाचे खापर प्रेक्षकांनी अभिनेता ब्रँडन रुथवर फोडले, त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीचा उतरता काळ सुरू झाला जो आजतागायत सुरूच आहे. गेल्या १५ वर्षांत ब्रँडन रुथने केलेला एकही चित्रपट आर्थिकदृष्टय़ा कमाल करू शकलेला नाही. सध्या अभिनेता हेन्री केव्हील सुपरमॅन साकारत आहेत. आतापर्यंतचा तो पाचवा सुपरमॅन आहे. परंतु त्याचीही तीच अवस्था आहे जी याआधीच्या चार सुपरमॅनची झाली. त्याने सुपरमॅन म्हणून साकारलेले ‘मॅन ऑफ स्टील’, ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन: डॉन ऑफ जस्टिस’ आणि ‘जस्टिस लीग’ हे तीनही चित्रपट सुपरफ्लॉप झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा शापित सुपरहिरो असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.