मराठीत नवनवीन विषयांवर आधारित चित्रपटांबरोबरच वेबमालिकाही प्रदर्शित होत आहेत. अशाच एक सत्यघटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ ही वेबमालिका सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर ४ ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे. मराठी वेबमालिका वा चित्रपट सध्या सोनी लिव्ह, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओसारख्या मोठ्या ओटीटी वाहिन्यांवरही प्रदर्शित होत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांचा पाठिंबा मिळाला तर भविष्यात अनेक मराठी वेबमालिका येऊ शकतील, असा विश्वास ‘मानवत मर्डर्स’चे लेखक गिरीश जोशी यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेबमालिकेच्या निमित्ताने लेखक गिरीश जोशी, दिग्दर्शक आशिष बेंडे आणि अभिनेता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लहान मुलींच्या निर्घृण हत्यांचे सत्र १९७२ ते १९७४ या काळात महाराष्ट्रात घडले होते. या हत्या का आणि कशा प्रकारे करण्यात आल्या? यामागे नक्की सूत्रधार कोण होते? आणि या गुन्ह्याचा छडा कसा लावण्यात आला? या प्रश्नांच्या अनुषंगाने वेबमालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. निर्माते – दिग्दर्शक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे निर्मित या वेबमालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आशिष बेंडे यांनी संभाळली आहे. या वेबमालिकेचे लेखन गिरीश जोशी यांनी केले असून आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

हेही वाचा >>>शेवटच्या आठवड्यात Bigg Boss Marathi ची वेळ बदलणार! नव्या मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय; फक्त ३ दिवसांसाठी…

दिग्दर्शक आशिष बेंडे म्हणाले, ‘माझा पहिला चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’. त्यानंतर मला गिरीश जोशी यांनी लिहिलेली कथा वाचायला दिली. एक सत्य घटना जी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, तरी तिची मांडणी, सादरीकरण करण्याची ज्या प्रकारची संधी मला या वेबमालिकेच्या निमित्ताने मिळणार होती ती मला महत्त्वाची वाटली आणि मी दिग्दर्शनासाठी होकार दिला’.

सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आलेले अनुभव आशिषने सांगितले. ‘मी महाविद्यालयात असताना ‘लगान’ चित्रपट पाहिला होता. त्यामुळे ‘लगान’ सारखा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या प्रतिभावंत कलाकाराला मी दिग्दर्शित करणार आहे, याच गोष्टीचा मला खूप आनंद झाला होता. दडपणही होतं, पण विशेष म्हणजे चित्रीकरण करत असताना त्यांनी कधीच त्यांच्यातील दिग्दर्शकाला डोकं वर काढू दिलं नाही, त्यांनी अभिनयावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं, त्यामुळे खूप सोपं झालं. सोनाली सेटवर येतानाच ती त्या व्यक्तिरेखेत काय भर घालू शकेल या विचाराने आलेली असायची. तिच्या कल्पना मला सांगायची, मग त्यावर हे कर किंवा हे नको असं तिला सांगितलं की त्याबरहुकूम ती पुढे काम करायची. तर, सई ताम्हणकरचे या वेबमालिकेतील पात्रच उथळ आहे. ती तिच्या बहिणीबरोबर वेगळं वागते, तिच्या मुलाबरोबर वेगळं आणि कामावरच्या लोकांबरोबर वेगळं वागणारं असं तिचं विचित्र पात्र होतं. तिचं पात्र नक्की कसं आहे हे लक्षात येत नाही, म्हणून सेटवर देखील तसंच वातावरण निर्माण केलं होतं. तर, मकरंद अनासपुरे यांना विनोदी भूमिकांमधून आपण अधिक पाहिलेलं आहे, पण यात त्यांनी पूर्णपणे नकारात्मक भूमिका साकारली आहे’, असं आशिषने सांगितलं.

अभिनेता म्हणून गोवारीकर यांनी पहिल्यांदाच मराठी या वेबमालिकेत भूमिका केली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना, ‘मी सीआयडी अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना खास मुंबईहून बोलावण्यात आलं होतं. ते हयात असताना मला त्यांना भेटण्याची संधी नाही मिळाली, पण त्यांच्या पत्नीबरोबर चर्चा केल्यानंतर मला त्यांच्याविषयी खूप माहिती मिळाली. त्याचा उपयोग मला ती भूमिका करताना झाला’, असं सांगतानाच भूमिका उत्तम होण्याचं श्रेय त्यांनी लेखक गिरीश जोशी यांना दिलं. वेबमालिकेची पटकथा जेव्हा मी वाचली, तेव्हा त्यातील दृश्यं हुबेहूब डोळ्यासमोर येतील असं उत्तम लेखन गिरीश जोशी यांनी केलं असून या पटकथेचंही पुस्तक व्हायला हवं इतकं अभ्यासपूर्ण लेखन असल्याचं गोवारीकर यांनी सांगितलं.

हेही वाचा >>>“त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही यात रुक्मिणी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘मला आदिनाथ कोठारेने रुक्मिणी या पात्रासाठी विचारलं, तेव्हा मला कुतूहल वाटलं की मी हे पात्र साकारू शकते असा विचार कोणी केला असेल? कारण अशा प्रकारची भूमिका मी कधी केली नव्हती. भारतात तांत्रिक प्रगती येण्याआधीच्या दिवसांतली ही घटना आहे. त्यामुळे नुसतंच अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. रुक्मिणीने जे केलं ते अत्यंत निर्घृण असलं तरी तिच्या कृतीमागचं मूळ हे तिच्या मूल नसण्याच्या दु:खात दडलेलं आहे. ज्या कारणाने तिच्या हातून ते कृत्य घडतं ते समजून घेऊन ते पात्र साकारणं हे एकाच वेळी त्रासदायक आणि तितकंच आव्हानात्मकही होतं’, असं सोनालीने सांगितलं.

विविध भारतीय भाषांमध्येही वेबमालिकेचे प्रदर्शन

मराठीत वेबमालिकांची संख्या का वाढत नाही, याबद्दल लेखक गिरीश जोशी म्हणाले, ‘मराठीत अधिक वेबमालिका होण्यासाठी निर्मात्यांचा पाठिंबा हवा. या वेबमालिकेच्या निमित्ताने मी अनेक वाहिन्यांना भेटलो. मी गेली ६ ते ७ वर्षे या मालिकेवर काम करतो आहे. जी समस्या मराठी चित्रपटांसमोर आहे, तीच मराठी वेबमालिकांसाठी देखील आहे. आपण वेबमालिका या फक्त मराठीपुरत्या मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचं धाडस केलं तर अधिक प्रेक्षक वेबमालिका पाहतील. त्यामुळे निर्मातेदेखील वेबमालिकांच्या निर्मितीत गुंतवणूक करण्याचे आणि त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस करतील. माझ्या मते याची सुरुवात ‘मानवत मर्डर्स’ या वेबमालिकेपासून झाली आहे. कारण ही वेबमालिका मराठीसह हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे’, असं गिरीश जोशी यांनी स्पष्ट केलं.

वेबमालिका म्हणजे दृश्यात्मक कादंबरीच’

आशुतोष गोवारीकर यांनी अभिनेता म्हणून याआधी ‘काला पानी’ या वेबमालिकेत काम केलं आहे. ‘मला ओटीटी हे माध्यम खूपच चित्तवेधक वाटतं, कारण काही कथा अशा असतात ज्या एका चित्रपटात मांडता येत नाही आणि जर त्या चित्रपटामधल्या पात्रांची देखील वेगळी गोष्ट मांडायची असेल तर त्याची मालिका होते. पण, मालिका आणि चित्रपटामध्ये जी एक पोकळी आहे ती भरून काढण्याचं काम वेबमालिकांनी केलं आहे, त्यामुळे तुम्हाला सविस्तर गोष्ट देखील सांगता येते आणि पात्रांविषयी सखोल माहिती किंवा त्यांची कथादेखील प्रेक्षकांना दिसते. त्यामुळे माझ्या मते वेबमालिका ही दृश्यात्मक कादंबरीच आहे’, असं मत आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केलं. दिग्दर्शक म्हणून अजून या माध्यमाचा अभ्यास सुरू आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची शैली अंगवळणी पडलेली असल्याने वेबमालिकेच्या दिग्दर्शनाचा विचार थोडा कठीण वाटतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.