छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एक गाथा नव्या कोऱ्या ऐतिहासिक चित्रपटातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराजांची आग्र्याहून सुटका या थरार मोहिमेवर आधारित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा ऐतिहासिकपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या जिजाऊंच्या भूमिकेत आणि अभिनेते यतीन कार्येकर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी याआधीही शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, मात्र मोठय़ा पडद्यावर ते पहिल्यांदाच ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. यानिमित्ताने, खुद्द डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते यतीन कार्येकर आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन चित्रपटाविषयी मनमोकळय़ा गप्पा मारल्या. शाळेत इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात वाचलेला आग्र्याहून सुटका हा धडा आता मोठय़ा पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डॉ. अमोल कोल्हेंची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्तिक केंद्रे यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही आघाडय़ा यशस्वीपणे सांभाळताना एकीकडे ऐतिहासिक मालिकांची निर्मिती आणि अभिनय अमोल कोल्हे करतच होते. मात्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घेऊन चित्रपट मालिका करण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला इथपासून ते ‘शिवप्रताप गरुडझेप’ची संकल्पना आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या अनुभवापर्यंत विविध विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा