प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं २८ सप्टेंबरला निधन झालं. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. महेश बाबूच्या आईच्या निधनाच्या एक दिवस आधी त्याच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. चोरी करण्याच्या उद्देसाने महेश बाबूच्या घरात चोराने शिरकाव केला होता.
‘मिर्ची ९ डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, २७ सप्टेंबरला रात्री उशिरा महेश बाबूच्या घरात शिरण्याचा प्रयत्न चोराने केला होता. घराभोवती असलेल्या ३० फूट उंचीच्या सुरक्षारक्षक भिंतीवरून उडी मारून चोर बंगल्याच्या परिसरात घुसला होता. परंतु, घरात प्रवेश करण्याच्या आधीच सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. घराच्या परिसरात असलेल्या ज्युबिली हिल्स पोलीस ठाण्यात याबाबत सुरक्षारक्षकांनी तक्रार दाखल करत चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा >> ‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार
पोलिसांनी या चोराची कसून चौकशी केली. महेश बाबूच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने गेलो असल्याचं त्याने सांगितले. ३० फूट उंचीच्या सुरक्षारक्षक भिंतीवरून उडी मारल्यामुळे चोराला दुखापत झाली होती. त्यामुळे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चोराला इस्पितळात दाखल केले. चोरीचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी महेश बाबू घरी नव्हता, अशी माहिती आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा >> “मी आरएसएसमध्ये सहभागी होण्यासाठी…”, केआरकेचं ट्वीट चर्चेत
महेश बाबूच्या आईच्या निधनावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांच्या आई इंदिरा देवी आवर्जून उपस्थित असायच्या. याच वर्षाच्या सुरुवातीला महेश बाबूने आपला भाऊही गमावला. महेश बाबूचा भाऊ निर्माते रमेश बाबू यांचंही याच वर्षाच्या सुरुवातीला निधन झालं.