बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. काल १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकची चर्चा तर सुरु आहे. पण त्यापेक्षा जास्त चर्चा ही तिच्या दागिन्यांची आणि त्यामध्ये दडलेल्या संदेशाची होतं आहे. आलियाचं मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्यांचा चुडा आणि मेंदीमध्येही इंग्रजीतील 8 अंकाप्रमाणे असलेले चिन्ह दिसून आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दडलेल्या संदेशची चर्चा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्रजीतील 8 अंक हा (Infinity symbol) इन्फिनिटी चिन्हासारखा दिसतो. कोणत्याही जोडप्यासाठी हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. कारण हे चिन्ह ते दोघं नेहमी एकत्र राहणार हे दाखवतं. आलियाच्या जवळपास सगळ्या दागिन्यांमध्ये आणि मेंहदींमध्ये हे चिन्ह दिसून आले आहे. त्यानंतर तिच्या दागिन्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे म्हणाले, “Jealous…”

आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video

आलियाच्या मंगळसूत्रात (Alia Bhatt Mangalsutra) काळे मणी आणि सोन्याच्या चेनपासून हे चिन्ह साकारण्यात आलं आहे. तर तिच्या गळ्यात एक टिअरड्रॉप डायमंड पेंडंटही आहे. या पेंडंटच्या वरच्या भागात इन्फिनिची चिन्ह होतं. याशिवाय आलियाच्या बांगड्यांच्या चुड्यामध्ये हे चिन्ह आहे. या व्यतिरिक्त त्याच ढग, चंद्र आणि तारे देखील आहेत. तिचा हा चुडा पारंपरिक पद्धतीचा नसून कस्टमाईज्ड आहे. फक्त आलियाच्या दागिन्यांमध्येच नाही तर तिच्या मेहंदीमध्येही हे चिन्ह दिसत आहे. तिच्या उजव्या हाताच्या क्लोजअप शॉटमध्ये हे दिसून आलं आहे. या सोबत तिच्या अंगठीतपण हे चिन्ह दिसत आहे. वेडिंग केक कापत असलेल्या फोटोमध्ये हे दिसून आलं आहे.