यशस्वी होण्याचा कोणताही फॉर्म्युला किंवा मंत्र नसतो…हा विचार आहे अभिनेत्री माधुरी दीक्षितचा. ८० आणि ९० च्या दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य करणाऱया माधुरीने आपल्या अनुभवावरून हा विचार मांडलाय.
एका कार्यक्रमात माधुरी म्हणाली, यशस्वी होण्याचा कोणताही मंत्र नसतो. सकारात्मक विचार ठेवून चांगले काम करत राहाणे एवढेच आपल्या हातात असते. खूप विचार करत न बसता काम करत करत पुढे जात राहाणे, हेच आपण कऱू शकतो.
धक धक गर्ल म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या माधुरीने १९९९मध्ये अमेरिकास्थित शल्यचिकीत्सकाशी लग्न केले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी ती भारतात परतली. ‘ये जवानी है दिवानी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात माधुरीने घागरा गाण्यावर सुरेख नृत्य केले होते.