९० च्या दशकातील ‘शक्तिमान’ हा हा सुपरहीरो लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय प्रेक्षक मोठ्या पडद्यावर या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता मुकेश खन्ना यांची शक्तिमान ही भूमिका घराघरात पोहोचली आहे. तर आता शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने ‘शक्तिमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आता प्रेक्षक ट्रेलरची वाट पाहत आहेत. तर ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांसमोर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश खन्ना यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मुकेश खन्नासोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे की नकुल मेहता हा ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

आणखी वाचा : सुप्रिया सुळेंनी लावली होती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला हजेरी, पाहा फोटो

आणखी वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री इस्लामच्या वाटेवर, ग्लॅमर विश्व सोडून हिजाब परिधान करण्याचा घेतला निर्णय

मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’चा टीझर शेअर केला होता. हा टीझर शेअर करत “आम्ही ‘शक्तिमान’ हा चित्रपट घेऊन येत आहोत हे सांगण्यात मला उशिर झाला. कारण आधीच ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तरी सुद्धा माझं हे कर्तव्य आहे की मी तुम्हाला जे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे. ‘शक्तिमान’ चित्रपट लवकरच येणार.” असे मुकेश खन्ना म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This actor will become new shaktimaan see fans reaction goes viral on social media dcp