बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षीचे लाखो चाहते आहेत. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या लेकीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी काही चाहत्यांनी तिला चुकीच्या पद्धतिने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. याचा तिच्यावर परिणाम झाला होता.
सोनाक्षीसोबत ही घटना मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या गांधी मैदानात घडली होती. सोनाक्षी इथे दबंग या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. सोनाक्षीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी जवळ येत तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सोनाक्षीवर याचा मोठा परिणाम झाला होता.
आणखी वाचा : गीता माच्या आयुष्यात खास व्यक्तीची एण्ट्री, जाणून घ्या या मिस्ट्री बॉयबद्दल
आणखी वाचा : भावाच्या मृत्यूची वडिलांनी केलेली भविष्यावाणी ठरली खरी; जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा
शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असल्यामुळे तिला बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोल होते. सोनाक्षीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला एवढी लोकप्रियता मिळाली नाही. दरम्यान, सोनाक्षी गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. ती सलमान खानच्या एका नातेवाईकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा चर्चा आहेत.