बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा २७ डिसेंबरला वाढदिवस होता. सलमानने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने सलमानसोबतचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि जिनिलिया डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘मोठ्या मनाच्या माणसाला खूप-खूप शुभेच्छा. जगातील सर्व सुख तुला मिळो. आमचे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आज भाईचा वाढदिवस’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
Flashback 2021: वर्षभरात ‘या’ पॉर्नस्टार झाल्या सर्वाधिक सर्च

australia work and holiday visa
भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ऑस्ट्रेलियाने लाँच केला वर्किंग हॉलिडे व्हिसा, याचा अर्थ काय? कसा होणार फायदा?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
munnawar faruqi on bishnoi hitlist (1)
मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर का आहे?
lawrence bishnoi pakistani gangster shahzad bhatti video call
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला तुरुंगातून केला होता Video कॉल!
Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
Ab De Villiers on Rohit Sharma
रोहित फाफ डू प्लेसिसच्या जागी RCB चे नेतृत्त्व करणार का? एबी डिव्हिलियर्सने विराटचा उल्लेख करत दिले उत्तर
MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
Elon Musk Giorgia Meloni dating rumours
एलॉन मस्क जॉर्जिया मेलोनीला ‘डेट’ करतायत? स्वतः मस्क यांनी व्हायरल फोटोवर दिली प्रतिक्रिया

जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांनीही एकाच रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहेत. डान्स करताना जिनिलिया एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसवरील असल्याचे दिसत आहे. तसेच या पार्टीला अनेक कलाकार देखील हजेरी लावल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया समोर आल्यावर सलमान म्हणाला की, त्याला सगळ्यात पहिलं गिफ्ट हे त्या सापाने दिलं आहे. “माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने मला दंश केला. त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि त्या सापाने पुन्हा एकदा मला दंश केला असा त्यानं मला तीन वेळा दंश केला. तर सापाने केलेले हे कृत्य पाहता त्यानेच वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट दिलं” असं सलमान म्हणाला होता.