छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी ते त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. यावेळी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात असलेली भारतीय टीमची कर्णधार मिताली राजने हजेरी लावली होती. यावेळी मितालीने तिला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा आहे ते सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ति आणि झूलन गोस्वामी यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिलने मितालीला कोणत्या बॉलिवूड कलाकाराशी लग्न करायला आवडेल असे विचारले. त्यावर मितालीचे उत्तर ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे.

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : प्रियांकाने ‘या’ कारणामुळे सोशल मीडिया हॅण्डलवरुन काढले जोनस आडनाव?

मिताली कपिलच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाली, मला बॉलिवूडमधील कोणत्या ही व्यक्तीशी लग्न करायला हरकत नाही. कारण मला ज्याच्याशी लग्न करायचं आहे. त्याचं लग्न झालं आहे. मला आमिर खान प्रचंड आवडतो.

Story img Loader