चित्रपटसृष्टीत कितीही नाही म्हंटलं तरी पुरुषांना केंद्रस्थानी ठेवूनच कलाकृती सादर केली जाते. सध्या जरी हे चित्र बदलत असलं तरी फारसा आमूलाग्र बदल अजून निदर्शनास आलेला नाही. कोणत्याही भाषेतील चित्रपटात महिला कलाकारांना नेहमीच दुय्यम भूमिका मिळतात हे निर्विवाद सत्य आहे. मग सतत तेच तेच काम केल्यानंतर काही अभिनेत्री या क्षेत्रातून काढता पाय घेतात तर काही अभिनेत्री स्वतःहून या क्षेत्रापासून वेगळ्या होतात. घरच्या जवाबदाऱ्या, खासगी कारणं देऊन या अभिनेत्री कलक्षेत्रापासून फारकत घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कुणी इस्लाम तर कुणी कृष्णाच्या भक्तीसाठी अभिनय क्षेत्र सोडलं; काहींनी तर नाव बदलत केला आध्यात्माचा स्वीकार

गेल्या काही वर्षात मात्र विशिष्ट एका धर्मासाठी चित्रपटात काम करायचं सोडणाऱ्या अभिनेत्रींची चांगलीच चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसिम, तसेच अभिनेत्री सना खान यांनी इस्लामसाठी चित्रपटात काम करायचं सोडल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. आता एका भोजपुरी अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे. भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या सफर अफशा या अभिनेत्रीने मनोरंजन सृष्टीतून बाहेर पडत असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली आहे.

आणखी वाचा : चित्रपट समीक्षणाबद्दल सैफने केलेल्या वक्तव्याला केआरकेने दिलं उत्तर; म्हणाला, “बॉलिवूडच्या नवाबला वाटतं…”

सहरने इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत या गोष्टीचा खुलासा केला आहे. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा तीनही भाषांमध्ये पोस्ट लिहून तिने शेअर केली आहे. सहर म्हणते, “मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की मी आजपासून मनोरंजन व्यवसायापासून फारकत घेत आहे. यापुढे इस्लाम आणि अल्लाहची सेवा हेच माझ्या जीवनाचं ध्येय असेल. मी माझ्या परमेश्वराकडे केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागते, माझ्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत.”

सना खान आणि जायरा वसिमनंतर सहर ही तिसरी अभिनेत्री आहे जीने केवळ धर्मासाठी स्वतःची करकीर्द संपवली आहे. सहरची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच गाजतीये. काहींनी सहरच्या या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली आहे तर तिच्या काही चाहत्यांनी कॉमेंटमधून तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This indian bhojpuri actress says goodbye to film industry for the sake of islam avn