विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले आहे. या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची घटना सगळ्यांना दाखवण्यात आली होती. बॉलिवूडमधील हा एकमेव चित्रपट आहे ज्याने IMDb च्या टॉप ५ आवडत्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळेच विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या चित्रपटाचे उदाहरण घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
आणखी वाचा : “बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टला आज वर्ष…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान बॉलीवूडमध्ये राहतील, तोपर्यंत हिंदी चित्रपट बुडत राहणार. या इंडस्ट्रीला लोकांच्या कथेपासून बनलेली लोकांची इंडस्ट्री बनवा, तेव्हाच ती जागतिक चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करेल”, असे विवेक अग्निहोत्री त्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ
पाहा पोस्ट
आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…
याआधी विवेक यांनी संसद भवनातील अशोकस्तंभाच्या प्रतिकृतीवरही वक्तव्य केले होते. विवेक अग्निहोत्री हे नेहमीच अनेक मुद्द्यांवर बोलत असतात.