‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या तीन दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन यांनी कार्यक्रमात त्यांच्या काळातील चित्रपट आणि सेटवरील बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. त्याचसोबत शूटींगदरम्यान झालेले बरेच मजेदार किस्सेसुद्धा सांगितले. अभिनेत्री वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात काम करतानाचा शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वहीदा रहमान आणि बिग बींनी ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. चित्रपटात वहीदा अमिताभ यांच्या कानशिलात लगावतात असं दृश्य होतं. त्यावेळी शूटिंगदरम्यान आपण खरोखर जोरदार कानशिलात लगावणार असं वहीदा यांनी बिग बींना सांगितलं होतं. या दृश्यासाठी अमिताभ बच्चनसुद्धा तयार होते. केवळ अभिनय वाटू नये म्हणून वहीदा यांनी खरोखरच बिग बींच्या कानशिलात लगावली होती. शूटिंग संपल्यानंतर बिग बी वहीदा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, ‘वहीदाजी, काफी अच्छा था.’ तेव्हा सेटवर हशा पिकला.

वाचा : ‘किंग खान’ची जादू ओसरली?; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब 

या प्रसंगाचा उल्लेख वहीदा रहमान यांनी एका पुस्तकातही केला होता. ते वाचून अभिनेते सुनील दत्तसुद्धा सावध झाले होते. कानाखाली मारण्याचे एखादे दृश्य चित्रपटात असल्यास केवळ अभिनय करावा, अशी विनंती सुनील दत्त यांनी केल्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is how amitabh bachchan had reacted when waheeda rehman slapped him on set